जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही प्रमुख पुरावे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहेत. आता या प्रकरणात नेमके कोण अडकते याकडे लक्ष असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याच प्रकरणावर आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यात एकनाथराव खडसे कोणता मोठा खुलासा करतात याकडे लक्ष लागले आहे.
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणामध्ये बँकेची मालमत्ता कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्याचा सुद्धा समावेश असल्याचे बोलले जात आहे.