Wednesday, August 17, 2022

बिहार व उत्तर प्रदेशमधील पीडितांना जाळून मारल्याचा कासोद्यात निषेध

- Advertisement -

कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) – बिहार व उत्तर प्रदेश मधील पीडितांना जाळून मारले या घटनेच्या जाहीर निषेध व दोषींना कडक कारवाई करण्याची मागणी मौलाना आझाद विचार मंच व त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कासोदा येथील ए,पी,आय श्री. जाधव यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बिहार मधील एका मुस्लिम मुलीवर दोन गुंडांनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला नकार दिल्यावर तिला दुसऱ्या दिवशी घरी जाऊन तिला जाळून टाकले . तर उत्तर प्रदेश मधील बुलंद शहर येथील पंधरा वर्षीय दलित मुलीवर अत्याचार करण्यात आला . अत्याचाराची तक्रार केल्याने ती तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणले . परंतु पीडित मुलीने न ऐकल्याने तिला सात गुंडांनी तिच्या घरी येऊन ठार मारले. दोन्ही पीडित मुली अल्पसंख्यांक समाजाचे असल्याने बिहार सरकार उत्तर प्रदेश सरकार यांनी त्वरित कोणतीही कारवाई केली नाही . तरी दोषींना कडक कारवाई होऊन शिक्षा व्हावी अशी मागणी केली. याप्रसंगी मौलाना आझाद विचार मंच व त्रिशक्ती ग्रुप महाराष्ट्र राज्यचे कार्यकर्ते नूरुद्दीन मुल्लाजी, सलाउद्दीन अलाउद्दीन शेख, आरिफ पेंटर ,झुल्फिकार अली, मंसूर खान पठाण ,शेख सलाम भाई ,शेख बशीर अब्दुल रफिक, शाकिरअली सय्यद उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या