बिहारमध्ये समाज कंटकांकडून ईव्हीएम मशीनची तोडफोड

0

छपरा – बिहारमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान ईव्हीएम फोडण्याची घटना समोर आली आहे. सोनापूर विधानसभा मतदारसंघातील नायगा गोपालपूर येथे मतदान केंद्रा (क्रमांक १३१) वर मोठा गोंधळ उडाला आहे. या मतदान केंद्रावर रागाच्या भरात ईव्हीएम मशीन फोडल्याचा प्रकार घडून आला आहे. ‘रंजीत पासवान’ असं या व्यक्तीच नाव आहे. ईव्हीएम मशीन फोडल्या प्रकरणी रंजीतला पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून, त्याची चौकशी चालू आहे. मात्र रंजीत पासवान यानं ईव्हीएम का? फोडलं हे अजून स्पष्ट झाले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.