Saturday, December 3, 2022

बिल्किस बानो यांना दोन आठवड्यात आर्थिक मदतीसह सरकारी नोकरी द्या

- Advertisement -

नवी दिल्ली : गुजरात दंगलींच्या काळात सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या बिल्किस बानो यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात बानो यांना 50 लाखांची भरपाई देण्याचा आदेश गुजरात सरकारला दिला आहे. यासोबतच आदेशात घर आणि सरकारी नोकरी देण्यासही सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

गुजरात दंगलीदरम्यान बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी एप्रिल महिन्यातही गुजरात सरकारला हाच आदेश दिला होता. मात्र त्यावेळी वेळेचे कोणतेही बंधन नव्हते. पाच महिने उलटून गेल्यानंतरही गुजरात सरकारकडून आदेशाची अंमलबजावणी करण्यात न आल्याने सर्वोच्च न्यायालायने पुन्हा एकदा नव्याने आदेश दिला आहे. यानुसार गुजरात सरकारला दोन आठवड्यात बिल्किस बानो यांना 50 लाखांची भरपाई द्यावी लागणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या