Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या पुरवठ्याबाबत तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष स्थापन
    जळगाव

    बियाणे, खते आणि किटकनाशकांच्या पुरवठ्याबाबत तक्रारींच्या निपटाऱ्यासाठी राज्य व जिल्हास्तरावरील नियंत्रण कक्ष स्थापन

    By April 22, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :- कोविड19 विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने निर्बंध जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने खरीप हंगाम-2021 मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणा-या वेगवेगळ्या अडचणींचे निवारणाकरीता कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आयुक्तालय स्तरावर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

    त्यानुसार आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षाशी दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधण्यासाठी संपर्काचा भ्रमणध्वणी क्रमांक 8446117500 तसेच कृषि विभागचा टोल फ्री क्रमांक 18002334000 या क्रमांकावर सुद्धा संपर्क करता येईल. सोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com वर सुद्धा मेलद्वारे पाठविता/नोंदवता येईल.

    त्याचबरोबर जळगाव जिल्हास्तरावरही नियंत्रण कक्ष स्थापन करणयात आला असून या नियंत्रण कक्षाचा भ्रमणध्वणी 9307525620 व दुरध्वनी 0257-2239054 या क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा ईमेल आयडी saojalgaon@gmail.com सोबत दिलेले आहेत.

    संबंधीतांनी आपल्या जिल्ह्यात येणा-या अडचणी व निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींगबाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना आपल्या जिल्ह्याच्या भ्रमणध्वणी, दूरध्वनी व टोल फ्री क्रमांक तसेच ईमेलवर नोंदवाव्यात. तक्रार नोंदविताना शक्यतो आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारींचा संक्षिप्त तपशिल द्यावा. किंवा सदरची माहिती को-या कागदावर लिहुन त्याचा फोटो व्हॅटसअप किंवा ईमेलवर पाठविल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोईस्कर होईल. ज्या शेतक-यांना व्हॅटसअपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी दूरध्वनी क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात.

    जिल्हास्तरावरील तक्रार नियंत्रण कक्षाकडून तक्रारदाराचे समाधान न झाल्यास आयुक्तालय स्तरावरील नियंत्रण कक्षाकडे नमूद केलेल्या भ्रमणध्वनी, दुरध्वनी व ईमेलवर आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असे अवाहन दिलीप झेंडे, कृषि संचालक (निवगुनि), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif