बिबट्याने केले गाय, वासरु फस्त

0

पाचोरा | प्रतिनिधी

नांद्रा ता. पाचोरा येथे बिबट्याचा पाळीव प्राण्यावर हल्ला करत  उत्तम कौतिक पाटील यांच्या गावालगत असलेल्या गट क्रं. ९ मधे दि. २७ डिसेंबर च्या मध्यरात्री  शेताच्या बांधावर बांधलेल्या एकूण चार ते पाच जनावरांच्या मधील एक पाच वर्षीय गाय व दिड वर्षीय वासरुवर हिंस्र प्राण्यांच्या हल्यात मयत अवस्थेत आढळून आले. मागील चार महिन्यांपूर्वी नांद्रा शिवारालगत असलेल्या हडसन शिवारातील हरण या वन्यप्राण्यावर बिबट्याने हल्ला करत फस्त केले होते. या भागात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष निदर्शनास आलेले आहे. वन्य प्राण्यांवर हल्ला करुण त्यांना झाडावर घेऊन नेल्याची ही घटना नवीनच असतांना गावालगत झालेल्या या घटनेमुळे शेतकरी वर्गात प्रचंड घबराहट पसरली आहे. वन विभागाने या घटनेचा पंचनामा करून शेतकरयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. गावाजवळ बिबटने हल्ला केल्याने गावातील नागरिकांना भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीक करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.