बिग ब्रेकिंग न्युज ; पारोळा येथे चार दिवस जनता कर्फ्यु

0

२७ ते ३० राहाणार पारोळा शहर बंद

पारोळा— प्रतिनिधी
राज्यात सध्या जिकडे तिकडे कोरोना चा प्रादु्र्भाव वाढत असल्याचे चित्र आहे व राज्यात सर्वाधिक रुग्ण हे १० जिल्ह्यात दिसुन येत आहेत या १० जिल्ह्या मध्ये जळगाव जिल्ह्याचा ही समावेश आहे,म्हणुन संपुर्ण जिल्ह्यात खबरदारी चा उपाय म्हणुन प्रत्येक तालुक्यात जनता कर्फ्यु घेणे हे महत्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणुन पारोळा तहसिल कार्यालयात आज प्रशासकिय अधिकारी व शहरातील व्यापारी महासंघा ची बैठक पार पडली यात शहरात दि,२७ ते ३० मार्च पर्यंत चार दिवसाचा जनता कर्फ्यु पाडण्याचे ठरले असुन शनिवार ,रविवार,
सोमवार, मंगळवार,असे चार दिवस आत्यवश्यक सेवा वगळता संपुर्ण शहर बंद राहाणार आहेे.

या बैठकीत प्रांत विनय गोसावी, तहसिलदार अनिल गंवादे,न,पा, मुख्याधिकारी ज्योती भगत,पारोळा पोलिस निरिक्षक संतोष भंडारे, पारोळा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, महेश हिंदुजा, उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान, नगरसेवक न,पा,कर्मचारी, व व्यापारी बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.