भडगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या सामान्य किमान कार्यक्रमातर्गत तालुका विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघ भडगाव यांचे संयुक्त विद्यमाने बाळद येथील मराठी शाळेच्या प्रांगणात काल दि १२ रोजी विधी साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महत्त्वाच्या विविध विषयांवर प्रमुख वक्त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ‘पाणी साठवण आणि जलसंधारण’ या विषयावर जलसंधारण विभागाचे शाखाधिकारी प्रवीण पाटील यांनी मार्गदर्शन केले.
‘प्रदूषण मुक्त पाणी आणि वायूच्या अधिकारा’ बाबत तालुका कृषी अधिकारी श्री. भगवान गोरडे यांनी मौलिक माहिती दिली. तसेच ‘अन्न व शिक्षणाचा अधिकार कायदा 2009’ संदर्भात महत्वाच्या बाबी ॲडव्होकेट निलेश तिवारी यांनी उपस्थितांना विशद केल्या. समारोपीय भाषणात श्रीमती आर.डी.खराटे अध्यक्ष, तालुका विधी सेवा प्राधिकरण, भडगाव यांनी ‘फौजदारी गुन्ह्यात बळी पडलेल्या व्यक्तींना नुकसान भरपाई योजना’ बाबत उपस्थित ग्रामस्थांना अमूल्य मार्गदर्शन केले.सदरील कार्यक्रमास न्यायमूर्ती .आय.जे.ठाकरे, भडगाव वकील संघाचे अध्यक्ष व्ही. आर. महाजन, सचिव ॲड. निलेश तिवारी, ॲड.एम.बी.पाटील, ॲड. आर.के.वाणी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन न्यायालयीन कर्मचारी बी.जी.नाईक यांनी केले. आभार प्रदर्शन ग्रामसेवक विकास जळकोटे यांनी केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी न्यायालयीन कर्मचारी. आर.जी.माकोडे, सरपंच विश्वास पाटील, माजी सरपंच संजय पाटील, पोलीस पाटील, शिक्षक हेमंत पाटील, कमलेश पाटील,केतन पाटील विजय पाटील, समाधान बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले. शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने उपस्थित महिला व पुरुष ग्रामस्थांनी घेतला.