बालविकास प्राथमिक विद्यामंदिरात क्रिडा सप्ताहाचा जल्लोष

0

भडगाव (प्रतिनिधी) : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बालविकास प्राथमिक विद्यामंदिर शाळेत क्रिडा सप्ताह जल्लोषात पार पडला. दि.१२ ते १८ डिसेंबर हा कालावधी केंद्रशासनामार्फत “Fit India Movement” अंतर्गत शालेय स्तरावर खेलो इंडिया अंतर्गत क्रिडा सप्ताह उपक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानिमित्त क्रीडा संस्कृती ची जोपासना व्हावी,क्रीडा विषयक वातावरण निर्माण व्हावे या अनुषंगाने शाळेत विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर सप्ताहाचा शुभारंभ शाळेतील उपस्थित सर्व शिक्षकवृंदांच्या हस्ते योगाभ्यास या उपक्रमाद्वारे करण्यात आला.विद्यार्थ्यांना योगासनांविषयी मार्गदर्शन करून वृक्षासन,पर्वतासन,चक्रासन,ताडासन सारखे विविध आसन शिकवण्यात आले.या उपक्रमात शिक्षकांचा देखिल सहभाग होता. त्याचप्रमाणे लंगडी,डॉजबॉल, आंधळी कोशिंबीर,लगोरी,लिंबू-चमचा सारख्या पारंपरिक खेळाचे देखिल आयोजन करण्यात आले होते.तसेच कवायती,धावणे,खो-खो यांसारख्या क्रीडा स्पर्धांचे आणि विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून क्रीडा व आरोग्य या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा देखिल घेण्यात आली.विद्यार्थ्यांचे शारीरिक मूल्यमापन व्हावे या अनुषंगाने Fitness Assessment in school चे आयोजन करून विद्यार्थ्यांचा BMI,plate tapping,Flemingo, balance,push ups, flexibility, running या चाचण्या घेण्यात आल्या.

सदर क्रीडा सप्ताहाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. क्रीडा सप्ताह शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती रामकुवर यांचे मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडला.तर शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सुनिता सूर्यवंशी,उपशिक्षिकअमोल बिऱ्हाडे,श्रीमती अर्चना खांडेकर,विकास झोडगे, सागर महाजन,श्रीमती अंजली सोनवणे,सौ.वंदना पवार,सौ.सिमा सोनवणे,कु.गायत्री पाटील,पूजा कासार, श्वेता सोनार यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.