बालगुन्हेगारी कायद्यासंदर्भात भुसावळात मार्गदर्शन

0

भुसावळ – बालकांचे हक्क, बालक विरुद्ध अत्याचार, लैंगिक शोषण, बालकामगार, मादक द्रव्याचा गैरवापर, सायबर क्राईम यासह अन्य  विषयावर बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी मार्गदर्शन केले.

पोलीस सप्ताह दिनानिमित्त येथील एम आय तेली शाळेत विद्यार्ध्याना मार्गदर्शन करण्यात आले. ८ जानेवारी सोहळा साजरा होत आहे.  महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त दिनांक 2 रोजी 10.30 वाजेला   एम.आय. तेली इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ येथे शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींची बैठक घेण्यात आली.

यावेळी त्यांना पोलीस सप्ताह दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या दररोजचे कार्यक्रम संबंधी माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात एमआय तेली इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन हाजी मुन्ना तेली, नगरसेवक साबीर शेख, यांसह इंग्लिश मीडियम स्कूल शिक्षक वृंद ,व 200 ते 250 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. याचवेळी इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे पोलीस सप्ताह दिनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.