Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बालकावर हिंस्र प्राण्याचा प्राणघातक हल्ला
    ताज्या बातम्या

    बालकावर हिंस्र प्राण्याचा प्राणघातक हल्ला

    Tushar BhambareBy Tushar BhambareDecember 1, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    रावेर येथील पाल भागात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या १० वर्षीय बालकावर हिंस्र प्राण्याने प्राणघातक हल्ला केल्याने बालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

    मांजल येथील गुराखी दिपला बारेला आपल्या मित्रासोबत दररोज शेळी व गुरे चारण्यासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे बुधवार, दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेळी व गुरे चारण्यासाठी वन्यजीव वनहद्दीतील कं.नं. ६१ मध्ये गेला असतांना याठिकाणी दबा धरून बसलेल्या हिंस्र प्राण्याने आधी शेळीवर हल्ला चढवला व त्यानंतर गुराखी दिपला बारेला याच्यावर हल्ला करून नाकावर, तोंडावर, पायावर व पाठीवर गंभीर जखमी केले.

    दरम्यान सोबतच्या गुराख्यानी गावाकडे धाव घेत गावात जाऊन गावकऱ्यांना  घटनेबाबत सांगितले. गावकरी घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बालकाला गंभीर जखमी करून हिंस्र प्राणी पसार झाला होता. यानंतर वडील माल्या बारेला व ग्रामस्थानी जखमी दिपला बारेला याला दुचाकीवर तत्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले.

    दिपल्या बारेला याच्या दोन्ही हातावर आणि पायावर हिंस्र प्राण्याची नखे लागली असून डोक्याची कवटी फुटलेली असल्याने सिटी स्कँन व पुढील उपचार करण्यासाठी जळगाव येथे रवाना केले असल्याची माहिती वैदकीय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली..

     

    Pal Raver
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार

    June 9, 2026

    पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार

    June 9, 2026

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif