बारावीच्या पहिल्याच पेपरला आठ विद्यार्थी डिबार

0

जळगाव :

जिल्ह्यात बारावीच्या पहिल्याच इंग्रजी विषयाच्या पेपरला मंगळवारी आठ विद्यार्थी डिबार झाले आहेत. त्यात चाळीसगाव तालुक्यातील महुणबारे परिक्षा केंद्रावर पाच तर भडगाव तालुक्यातील कोळगाव परिक्षा केद्रांवर दोन, यावल तालुक्यातील सांगवी येथील परिक्षा केंद्रांवर एक विद्यार्थी डिबार करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात निरंतन शिक्षणाधिकारी वाय.पी.निकम यांच्या पथकाने पाच तर डॉ.मंजुषा क्षिरसागर यांच्या प्राचार्य डायट पथक जळगाव यांनी भडगाव तालुक्यातील गो.पु.पाटील विद्यालयात दोन तसेच यावल तालुक्यातील ज्योती मंदिर सांगवी येथे प्रांतधिकारी फैजपूर यांनी एका विद्यार्थ्यांस डिबार केले आहे. जिल्ह्यात बारावीच्या परिक्षेला ४९ हजार ४०३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. जिल्ह्यात बारावीची ७१ परिक्षा केद्रांवर परिक्षा होत आहे. बारावीची १३ परिक्षा केंद्रे उपद्रवी असून त्याठिकाणी परिक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबंस्त वाढविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.