Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के; मुलींची बाजी..
    महाराष्ट्र

    बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के; मुलींची बाजी..

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 3, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल 99.63 टक्के एवढा लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 8.97 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद या विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

    करोनाच्या प्रादुर्भावामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल लावण्याचे निकष तयार करून त्याची अंमलबजावणीही करण्यात आलेली आहे. दहावीसाठी 30 टक्‍के, अकरावीसाठी 30 टक्‍के, बारावीसाठी 40 टक्‍के याप्रमाणे 100 टक्‍के गुणाप्रमाणे मुल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकाल जाहीर केला आहे.

    विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. विषयनिहाय संपादीत केलेले गुणाच्या माहितीची प्रिंटही विद्यार्थ्यांना काढून घेता येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातील 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.

    विभागीय मंडळनिहाय टक्केवारीत निकाल –
    पुणे – 99.75 नागपूर- 99.62 , औरंगाबाद- 99.34 , मुंबई- 99.67 , कोल्हापूर- 99.67 , अमरावती- 99.37 , नाशिक- 99.61 , लातूर- 99.65 , कोकण – 99.81 .

    निकाल –
    मुले – 99.53 टक्के
    मुली -99.63 टक्के

    कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध असणार आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाशिवायची इतर सांख्यिकीय माहिती www.mahresult.nic.in आणि https:msbshse.co.in या संकेतस्थळावर मिळणार आहे.

    निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ
    – https://hscresult.11thadmission.org.in
    –  https://msbshse.co.in
    –  hscresult.mkcl.org
    –  mahresult.nic.in

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #maharashtra Educational News HSC Result 2021 latest news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    October 12, 2026

    पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त

    October 12, 2026

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif