बारामतीहुन आलेल्या ऊस तोडणी कामगारांचे विलगीकरण ; गारखेडा जिप शाळेत केली रवानगी

0

जामनेर (प्रतिनिधी): – बारामती (जि पुणे) येथुन आलेल्या १४ ऊस तोडणी कामगारांना तालुक्यातील गारखेडा येथील जिल्हापरीषद शाळा व अंगणवाडीच्या ईमारतीत विलगीकरणासाठी रवानगी करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या वतीने नुकतीच ऊस तोडणी कामगारांबाबत निर्णय घेण्यात आला होता.

त्यांना ज्याच्या-त्याच्या गावी जाऊ देण्यात यावे, त्यामुळे बहुधा सर्वच कामगार आपल्या लव्या-जम्यासह रवाना झाले असावे.त्याअंतर्गतच गारखेडा तांडा येथील रहीवाशी असल्याने ते ऊसतोडणी कामागार रवीवार (२६) रात्रीच्या वेळी गारखेडा येथे आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली.त्या नंतर प्राथमीक आरोग्यकेंद्राचे डॉ युवराज उंबरकर,आरोग्य सेवक अशोक सुर्यवंशी,डी बी महाले,आशासेवीका सुनीता राठोड आदींनी सर्वांची वैद्यकीय तपासणी केली.या सर्व ऊसतोडणी कामगारांची खान-पानाची व्यवस्था सरपंच अशोक पाटील,उपसरपंच मालतीबाई पवार,पोलीसपाटील बालचंद राठोड,ग्रामसेवक मनीष पाडळसे,अंगणवाडीसेवीका अरूणा पवार आदी पहात आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.