Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»बारामतीत या तुम्हाला तुमची जागा दाखवू
    ताज्या बातम्या

    बारामतीत या तुम्हाला तुमची जागा दाखवू

    Tushar BhambareBy Tushar BhambareJanuary 18, 2019No Comments7 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    खा. अजित पवार यांचे ना. गिरीश महाजनांना आवाहन

    जळगाव दि. 18-
    भाजप सरकारने जळगावकरांना काय दिले? असा प्रश्न विचारत जळगाव, धुळे जिंकणार्‍या व बारामती विकत घेवून जिंकण्याची भाषा करणार्‍या गिरीश महाजनांनी बारामतीत यावे, त्यांना त्यांची जागा दाखवू असे खुले आवाहन खा. अजित पवार यांनी ना. गिरीश महाजनांना दिले. त्याचप्रमाणे बारामती विकत घेण्याची भाषा खपवून घेतली जाणार नाही. गेली 15 वर्षे आम्ही बारामतीतून निवडून येत आहोत. हे कुठले काय? यांना एवढी अक्कल आली का? अशी खोचक टीका करतयशाने हुरळून जायचे नसते, दमाने घ्या जरा निटविचार करा! असा सल्ला त्यांनी ना. महाजन यांना दिला.
    राष्ट्रवादीतर्फे आयोजित निर्धार परिवर्तनाचा, साद राष्ट्रवादीची साथ महाराष्ट्राची ही संपर्क यात्रा 2019 ही खान्देशात पोहोचली त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दि. 18 रोजी मणियार ग्राऊंड येथे संध्याकाळी विधानसभा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व खा. अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ, फौजिया खान, जयदेव गायकवाड, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी खा. ईश्वरलाल जैन, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील, विलास पाटील, अनिल भाईदास पाटील, संतोष चौधरी, गफ्फार मलीक, संजय गरुड, कल्पना पाटील, मंगला पाटील, मिना चौधरी जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी आदी उपस्थित होते.
    सत्ताधारीच आजारी झाले
    मोदी म्हणाले होते की काळ्यापैशावाले आजारी पडतील मात्र 2014 नंतर काळ्यापैशावाले नीरव मोदी, चौकसी आदी टुणटुणीत फिरताहेत मात्र सुषमा स्वराज, अरुण जेटली, अमित शहा, नितीन गडकरी हेच आजारी पडल्याची खोचक टीका त्यांनी यावेळी केली. काळ्या पैशाच्या नावाखाली गाजर दाखविणे थांबवा.
    अखिलेश व मायावतीला रोखण्यासाठी नोटाबंदी
    उत्तरप्रदेशातील मायावती व अखिलेश यादव यांना रोखण्यासाठी भाजपाने नोटाबंदी लागू केली. यासाठी देशातील जनतेला वेठीस धरण्यात आले. त्यातील 15 कोटी काळापैसा पांढराकसा झाला? असा प्रश्न त्यांनी विचारला. त्याचप्रमाणे सत्तेचा गैरवापर करत स्थानिक राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर खोटे गुन्हे दाखल केले. यांच्यापेक्षा इंग्रजांचे पारतंत्र्य बरे होते अशी टीका त्यांनी केली.तुमले भेटाले ऊनो
    तुमले भेटाले ऊनो असे म्हणत अजित पवारांनी भाषणाची सुरुवात अहिराणीतून केली. लोकांनी नाकारलं आम्ही मान्य केलं. त्यांना संधी दिली मात्र मोदी सांगता वेगळे कृती वेगळी करतात. शेतकरी उद्ध्वस्त झालाय. जिल्ह्यातील धानवड येथे बोंडअळीला अनुदान नसल्याने शेतकरी आंदोलन करताहेत त्यांना गुलाबराव पाटील दमदाटी करतात रावसाहेब दानवे साले म्हणतात. अशी टीका करत सत्तेची मस्ती टीकत नाही. जनता वाटेत ते करेल. अशी टीका त्यांनी केली.
    स्मारक बंद व डान्सबार सुरु
    शिवस्मारक, बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे काम थांबवतात आणि डान्सबार सुरु करतात. यासाठी हे निवडून आले का? या निर्णयात तोडीपाणी झाल्याची टीका त्यांनी केली. कुठेतरी पाणी मुरतेय. त्रुटी काढून पुन्हा कायदा करा व नवीन पिढी वाचवा असे आवाहन त्यांनी केले.
    शिवबा व बाबासाहेबांचे पुतळे लहान?
    सरदार पटेलांचा पुतळा मोठा मात्र छत्रपती, बाबासाहेब एवढेच काय राष्ट्रवादीचे सरकार असताना बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाची उंची 18 मी. होती ते काम थांबवून उंची 8 मी. इतकी कमी केली, असे का? असा सवाल त्यांनी विचारत सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता रोखण्याची गरज असल्याचे म्हटले.
    मनपा निवडणुकीत 60 कोटी खर्चाची ऐपत कशी काय?- धनंजय मुंडे
    काही वर्षापुर्वी अटल बिहारी वाजपेयी यांचा सत्कार जळगावात करण्यात आला होता त्यावेळी कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करुन त्यांना थैली दिली होती. अटलजींनी पक्षासाठी दिली होती. असाच सत्कार एकनाथराव खडसे यांचा करण्यात आला होता त्यांनाही पैशाची थैली देण्यात आली होती. 2018 मध्ये झालेल्या जळगावच्या मनपा निवडणुकीत 60 कोटी रुपये खर्च करण्याची ऐपत भाजपात कशी आली? धुळ्यातही 60 कोटी, मुंबईत 100 कोटी खर्च करण्यात आले, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारचे वाभाडे काढले. 2014 नंतर देश बदल रहा है ही भाजपाची जाहिरात पाच राज्यांच्या विरोधी निवडणुक निकालानंतरही चालू असून नितीन गडकरी यांनी अच्छे दिन महसूस करना होता है असे एका मुलाखतीत सांगितल्याची बोचरी टीका त्यांनी केली. एनडीएवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍या राज्यातील 16 मंत्र्यांनी पैसे खावून 90 हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला. नरेंद्र मोदींचा गझनी तर देवेंद्र फडणवीसांचा फसवणीस झाल्याची टीका त्यांनी केली. ना. महाजनांच्या पिस्तोल प्रकरणावर त्यांनी टीका केली तर माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासारखा विकास जळगावचा कोणीच केला नसून तेव्हापासून विकास थांबला आहे. त्यामुळे तुमच्या मतदानातून परिवर्तन घडले पाहिजे अबकी बार मोदीकी हार अशी घोषणा केली.

    बाहुबलीने कटप्पाको क्यो मारा?- जयंत पाटील
    र्ी भाजपा हा अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणींचा राहिला नाही. यावेळी मोदींच्या 2014 मधील भाषणांच्या विविध भाषणांतील आश्वासनांच्या क्लीप दाखवून पुर्तता झाली नसल्याची टीका करण्यात आली. अमित शहा यांचे 15 लाख कोणाच्या अकाऊंटमध्ये नाही जात नाहीत असे बोलल्याची क्लीप ऐकविण्यात आली. भाजपात एकनाथराव खडसे हे स्वाभिमानी व्यक्ती होते. ते भाजपात ज्येष्ट होते त्यांचा आम्हीही आदर करायचो नेहमी त्यांच्या मागे बसणारे देवेंद्र फडणवीस यांची खडसेंवर खप्पा मर्जी झाली. त्यामुळे खडसेंची काय अवस्था झाली आहे. फडणवीस वयाने कमी असताना खडसे घरी का? अखेर बाहुबलीने कटप्पाको क्यों मारा? असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
    इसलिए चुनके आयेगी राष्ट्रवादी की घडी- छगन भुजबळ
    र्ी महत्वाच्या शहरात परिवर्तन यात्रा आली आहे. महानगरपालिकेत विजय मिळवणारी भाजपा 100 कोटी देणार होती. ते मंत्रीमंडळ घरी जायच्या आत द्या, अशी जाहीर विनंती छगन भुजबळ यांनी ना. महाजनांना केली. समांतर रस्त्याचे काम हे लहान काम असून मुख्यमंत्र्यांचे संकटमोचन असलेल्या महाजनांनी त्वरित पुर्ण करावे, ही अपेक्षा व्यक्त केली. त्याचप्रमाणे ना. गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना आगे लाल गाडी पिछे लाल गाडी बिचमे गुलाबराव गडी डेवलप उधर खडी इसलिए चुनके आएगी राष्ट्रवादीकी घडी अशी खरमरीत टीका छगन भुजबळ यांनी केली.
    चालू केले डान्स बार आणि लावण्या
    र्ी जळगावात झालेल्या 31 डिसेंबर रोजी झालेल्या रेव्ह पार्टीत मोठे मासे सटकले आहेत. यातील पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी टीका केली. त्याचप्रमाणे जळगावच्या 193 टीएमसी पाण्यापैकी 102 टीएमसी पाणी गुजरातला जात आहे. नारपारमधील पाणीही गुजरातला जात असून त्याचा विरोध करायला हवा असे ते म्हणाले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!

    October 16, 2026

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif