खामगांव (प्रतिनिधी)खामगाव शहरात बारादरी भागात नेहमीच आजू बाजूच्या व्यापारी, दुकानदारांच्या दुकानात माल आणणारे व माल नेणारे वाहने नेहमीच रस्त्यामध्ये उभे असतात त्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रस्ता जामचा त्रास सहन करावा लागतो.
या भागातील अनेक तेलाचे व्यापारी विनाकारण काम नसताना सुद्धा खाली तेलाचे टॅंकर रस्त्याच्या कडेला लावून रस्ता जाम करण्यास हातभार लावतात हे विशेष या ठिकाणी आधी एका तिनं चाकी एपे रिक्षा चा अपघात झाला होता. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नव्हती हे विशेष परंतु भविष्यात त्या ठिकाणी अपघात घडू शकतो तरी पोलीस प्रशासनाने या भागातील व्यापारीनां समज देऊन उचीत कारवाई करावी नेहमीचे या भागातील रस्ता जाम ची समस्या निकाली काढावी अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.