बाबा सिद्दीकींची ईडीने जप्त केली ४६२ कोटींची संपत्ती

0

मुंबई : एसआरए घोटाळ्यात ईडीने काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना दणका दिला असून अंमलबजावणी संचालनालयाने सिद्दीकींची मुंबईतील तब्बल ४६२ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. वांद्रे पश्चिममध्ये बाबा सिद्दीकी यांच्या ‘पिरॅमिड डेव्हलपर्स’ या कंपनीच्या नावे ३३ फ्लॅट्स होते.

ही कारवाई वांद्र्यातील एसआरए योजनेतील घोटाळ्याच्या आरोपांचा तपास करताना पीएमएलए कायद्यांतर्गत करण्यात आली. बाबा सिद्दीकींवर चारशे कोटींच्या एसआरए योजनेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करुन कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

हा घोटाळा वांद्रे रेक्लमेशनजवळ असलेल्या जमात ए जमुरिया झोपडपट्टी परिसरात आलिशान फ्लॅट बांधून केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली होती. बनावट कागदपत्र तयार करुन जास्तीचे फ्लॅट लाटले, सिद्दीकी आणि बिल्डरने फसवणूक करण्यास लोकांना मदत केली आणि एक आलिशान इमारत बांधून, ती विकून मोठा नफा कमावल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार करुन अतिरिक्त एफएसआय लाटल्याचा दावा केला जात आहे. सिद्दीकी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.