नवी दिल्ली : देशात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. देशात २४ तासात कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.मागील २४ तासात सर्वाधिक 90 हजार 802 रुग्ण सापडले. तर, 1016 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या सध्या 42 लाख 04 हजार 614 झाली आहे.
तर, सध्या देशात 8 लाख 82 हजार 542 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 32 लाख 50 हजार 429 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील मृतांचा आकडा हा 71 हजार 642 झाला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनं दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबरपर्यंत देशात 4 कोटी 95 लाख 51 हजार चाचण्या करण्यात आल्या. यात एकाच दिवसात 7 लाख 20 हजार चाचण्या झाल्याची नोंद आहे.