Wednesday, May 18, 2022

बापरे.. दहावीच्या मुलीने सोशल मीडियावरच्या मित्राला गिफ्ट दिले ७५ तोळे सोने..

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक फसवणूकीचे प्रकार वाढतांना दिसत आहे. तसेच अनेक जण वेगवेगळे आमिष दाखवून सोशल मीडियावर मैत्री देखील करताना दिसताय. मात्र केरळमधून असा प्रकार समोर आलाय तो जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील चकित व्हाल. केरळच्या तिरुअनंतपुरम येथे राहणाऱ्या एका दहावीच्या शाळकरी मुलीने सोशल मीडियावर ओळख झालेल्या मित्राला तब्बल ७५ तोळे सोने भेट म्हणून दिले आहे.

- Advertisement -

एशियानेट न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी शिबिन नावाच्या एका मुलाने सोशल मीडियावर पोस्ट केले होते की, तो खूप आर्थिक अडचणीत आहे. ही पोस्ट पाहून या १५ वर्षीय शाळकरी मुलीने त्याला मॅसेज केला आणि त्याच्याशी बोलणे सुरू झाले. रोज बोलणे होत असल्याने या मुलीची आणि त्याची मैत्री झाली आणि दोघे अगदी जवळ आले. भावनेच्या भरात शिबिनच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी तिने एक आश्चर्यकारक पाऊल उचलले.

- Advertisement -

या दहावीला असणाऱ्या मुलीच्या घरात बेडखाली एक गुप्त पेटी ठेवण्यात आली होती, ज्यामध्ये कुटुंबाचे पारंपारिक सोने ठेवले होते. मात्र मुलीने तिच्या सोशल मीडिया मित्राला मदत म्हणून ७५ तोळे सोने दिले. शिबिनला हे सोनं मिळाल्यानंतर आईच्या मदतीने शिबिनने हे सोने विकले. नंतर शिबिन आणि त्याच्या आईने घराचे रिनोव्हेशन केले आणि उर्वरित ९.८ लाख रुपये घरात ठेवले.

घरातून सोने गहाळ झाल्यानंतर मुलीच्या आईने पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर शिबिन आणि त्याची आई शाजीला अटक करण्यात आली आणि दोघांचीही चौकशी करण्यात आली. दरम्यान, यावेळी या मुलीने पोलिसांना सांगितले की, तिने एक वर्षापूर्वी शिबिनला सोने दिले होते. पोलिसांनी शिबिनच्या घरातून सध्या दहा लाख रुपये जप्त केले आहेत.

मात्र चौकशी दरम्यान, शिबिनने पोलिसांना सांगितले की, मुलीने त्याला ७५ तोळे नाही तर केवळ २७ तोळे सोने दिले होते. तेव्हा या प्रकरणात एक नवीन वळण आले आणि मुलीच्या वक्तव्यामुळे पोलिसही गोंधळलेले आहेत. खूप चौकशी केल्यानंतर विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले की, ७५ तोळे सोन्यापैकी ४० तोळे सोनं तिने पलक्कड जिल्ह्यातील दुसऱ्या तरुणाला दिले, ज्याला ती इन्स्टाग्रामद्वारे भेटली होती आणि त्यांच्यात ओळख झाली होती. सोने मिळताच पलक्कड जिल्ह्यातील तरुणाने तिला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या