Sunday, May 29, 2022

बापरे.. गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागणार तब्बल ‘इतके’ पैसे; सबसिडी होणार बंद ?

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईने चांगलाच उच्चांक गाठत आता सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. त्यातच आता सर्वसामान्य आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही दिवसांत एलपीजी सिलेंडर महागण्याची शक्यता आहे. ग्राहकांना एलपीजी सिलेंडरसाठी १००० रुपये मोजावे लागू शकतात. इतकंच नाही तर सरकार एलपीजी सिलेंडरवर मिळणारे अनुदानही रद्द करण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने केलेल्या अंतर्गत मूल्यांकनात ग्राहक एलपीजी सिलेंडरसाठी १००० पर्यंत पैसे मोजण्यास तयार असल्याचं समोर आलं आहे. मात्र अद्याप केंद्र सरकारकडून यासंबंधी कोणताही अधिकृत माहिती दिली आहे.

एलपीजी सिलेंडरच्या अनुदानासंबंधी सरकार दोन भूमिका घेण्याची शक्यता आहे. यानुसार सरकार सध्याच्या योजनेत कोणतेही बदल करणार नाही किंवा उज्ज्वला योजनेंतर्गत आर्थिकदृष्या सक्षम नसणाऱ्या ग्राहकांनाच अनुदान देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र याबाबत अद्याप सरकारकडून कोणतीही स्पष्टता नाही.

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सरकारने अनुदान म्हणून ग्राहकांना ३५५९ कोटी रुपये दिले होते. २०१९-२० मध्ये खर्चाचा हा आकडा २४ कोटी ४६८ इतका होता. म्हणजेच सरकारने एका वर्षात अनुदानामध्ये सहा पटीने कपात केली आहे.

* अनुदानासाठी सध्याचा नियम

सध्याच्या नियमानुसार, जर तुमचं वार्षिक उत्पन्न १० लाखांपेक्षा जास्त आहे तर तुम्हाला एलपीजी सिलेंडरवर अनुदानाची सुविधा मिळणार नाही. मे २०२० मध्ये काही ठिकाणी अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

गेल्या साडे सात वर्षात घरगुती गॅल सिलेंडरची (१४.२ किलो) किंमत दुपटीने वाढली आहे. मार्च २०१४ ला १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ४१० रुपये ५ पैसे होती, जी आता ८८४ रुपये ५० पैसे आहे. भारतात जवळपास २९ कोटी लोकांकडे एलपीजी कनेक्शन आहे. यामध्ये उज्ज्वला योजनेंतर्गत येणाऱ्यांची संख्या आठ कोटींच्या आसपास आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या