बांबरुड येथील कोविड केअर सेंटरला गिझरची भेट

0

पाचोरा (प्रतिनिधी) : बांबरूड (महादेवाचे) ता. पाचोरा येथील कोवीड सेंटरला दररोज थंड पाण्याने रूग्णांना अंघोळ करावी लागत असते. रूग्ण हे आजारी असल्याने वरून त्यांना पाणी थंड ? ही परीस्थिती असतांना याबाबत काही रूग्णांनी युवासेनेचे मिडीया प्रमुख अजयकुमार जैस्वाल यांना या समस्येबाबत भ्रमणध्वनीवरून माहीती दिली असता त्याच क्षणी शासकीय यंत्रणेची वाट न पाहता थेट लोक सहभागाची व मदतीचे आवाहन केले.

याबाबत येथील जीवन जैन व दिनेश बोथरा यांच्याशी संपर्क साधुन माहिती दिली असता एक – दोन गिझरची मागणी केली. परंतु कोविड सेंटरमधील रुग्णांची संख्या पाहता जीवन जैन व दिनेश बोथरा यांनी चार गिझर केवळ अर्ध्या तासात देण्याचा निर्णय घेतला. या गिझरमुळे रूग्णांना अंघोळीसाठी आता गरम पाणी  मिळणार आहे. या गिझरचे कोविड सेंटरला लोकार्पण शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर यांच्या हस्ते रूग्णांसाठी करण्यात आले. यावेळी तहसिलदार कैलास चावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ, सुमित सावंत, शरद पाटील व पत्रकार सोनु परदेशी, महेंद्र अग्रवाल उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.