भडगाव ( प्रतिनिधी) : – येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या माऊली फाऊंडेशन तर्फ दि ७ ते १४ नोव्हेंबर दरम्यान “बांधिलकी सप्ताह” साजरा करण्यात आला. या सप्ताहात “माऊली स्वावलंबन योजने”च्या माध्यमातून सहा व्यक्तींना तर “माऊली शिष्यवृत्ती योजने”च्या तीन विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.
स्वावलंबन योजनेतून गरजुंना अर्थसहाय्य्य करण्यात येते. ज्याची परतफेड सुलभ हप्त्याने करण्यात येते. सुरेश भिका पाटील या तरुणाला केळी वेफर्स विक्रीसाठी, रशीद कादिर पिंजारी या तरुणाला चहाची गाडी लावण्यासाठी, संजय शंकर पाटील यांना हमालीसाठी तर प्रीती भरत धोबी या दिव्यांग भगिनीस कटलरी साहित्य विक्रीसाठी हात गाडी घेण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात आले. तसेच महेश माळी या तरुणास छोट्या किराणा दुकानासाठी तर वसीम पटवे हया तरुणास इलेक्ट्रिक व प्लंबिंग साहित्य खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात आले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शिक्षण अर्धवट राहू नये, यासाठी फाउंडेशनच्या वतीने शिष्यवृत्ती योजना राबवली जाते ह्या योजनेअंतर्गत डी. फार्मसी चे शिक्षण घेणाऱ्या ऋतिक वाल्मीक माळी, कृष्णा आबा मोरे या विद्यार्थ्यांना अनुक्रमे 15 हजार व पाच हजार रुपये तर एम. एस. सी चे शिक्षण घेणाऱ्या प्रतीक्षा अशोक ततार ह्या विद्यार्थ्यांनीस सहा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, योगेश शिंपी, सुशिल महाजन, रवींद्र कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, डॉ. प्रशांत पाटील, अभिजित पवार प्रा.सुरेश कोळी, स्वप्निल सूर्यवंशी व देवेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.