बहूळा प्रकल्पाचे नामांतर “कृष्णा सागर” होणार

0

पर्यटन स्थळाची करणार निर्मिती – आमदार किशोर पाटील

पाचोरा (प्रतिनिधी) :-पाचोरा मतदार संघाचे माजी मंत्री कै. कृष्णराव महारु पाटील यांच्या अथक प्रयत्नातून तालुक्यात सुमारे लहान मोठे जल प्रकल्प झाल्यानेच तालुका वासीयांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळत आहे. त्यांचे या माध्यमातून तालुक्यावर अनंत उपकार असल्याने तालुक्यातील सर्वात मोठे असलेल्या बहुळा प्रकल्पाचे नामांतर करून ते आता बहुळा ऐवजी कै. कृष्णराव महारु पाटील ( के.एम. बापू पाटील) यांच्या नावातच उल्लेख असलेल्या कृष्ण मूळे प्रकल्पाचे नाव कृष्णसागर असे नामांतर करण्याचा सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकानी श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून ठराव करण्यात आला आहे. या प्रकल्पाजवळील जुन्या बिलदी गावच्या जागेत भव्य असे गार्डन तयार करून पर्यटकांना आनंद घेण्यासाठी बोटीचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.

येथील शिवसेना कार्यालयातील आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हापरिषद सदस्य, पदमसिंग पाटील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, सेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेश पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, बाजारसमितीचे अॅड. दिनकर देवरे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, प्रा. चंद्रकांत धनवडे उपस्थित होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, श्रीकृष्ण जन्माष्टमीचे निमित्त शिवसैनिकानी नावीन्यपूर्ण व कै. के. एम. (बापू) पाटील यांच्या नावास साजेसा उपक्रम हाती घेतला असून बहुळा प्रकल्पाचे नामांकन करण्यासाठी राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री यांच्याकडे ठराव पाठवून सरकार दरबारी ही बहुळा प्रकल्पाचे नाव आता कृष्णसागर केले आहे. नामांतरासाठी दि. २९ रोजी गुरुवारी सकाळी ११ वाजता नामांतराचे बॅनर चे उद्घाटन कै. के एम (बापू) पाटील यांच्या अर्धांगिनी श्रीमती कमलताई कृष्णराव पाटील यांच्याहस्ते केली जाणार असून यावेळी आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते जलपूजन ही केले जाणार आहे.

कै. के एम (बापू) पाटील हे पाटबंधारे मंत्री व आरोग्यमंत्री असताना त्यांनी दूरदृष्टी ठेऊन तालुक्या बहुळा, हिवरा, अग्नावती, घोडसगाव, पिंपळगाव, अटलगव्हान, कोल्हे, डाभुर्णी- पिंप्री, वानेगाव-राजुरी, सार्वे-पिंप्री, सातगाव डोंगरी, लोहारा, उमरदे, म्हसाळा कोकडी, गारखेडा, मोहलाई, दिघी, बदरखे, सार्वे-खाजोळे, गाळण नं.१, गाळण नं.२, वाडी नं.१, वाडी नं.२, यासारखे लहान मोठे ४० प्रकल्प करून तालुकावासीयांवर अनंत उपकार केले आहेत.

कै. के एम (बापू) पाटील यांचे माध्यमातून तालुक्यातील सर्वात मोठा असलेला ७६८ हेक्टर चा बहुळा प्रकल्प भरण्यासाठी नदीजोड प्रकल्पाद्वारे उतावळी चे वाया जाणारे लाखो लिटर पाणी पाईपलाईन द्वारे बहुळा प्रकल्पात सोडण्यात येणार आहे. यामुळे बहुळा प्रकल्पावर आधारित असलेल्या पाचोरा शहर, गोरडखेडा बु”, गोराडखेडा खु”, वेरुळी बु”, वेरुळी खु”, आर्वे, साजगांव, बिल्दी, खेडगाव (नंदीचे), हडसन – पहाण, वडगाव टेक, लोहरी बु”, लोहारी खु” येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाह परिसरातील अडीच हजार हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.