जामनेर | प्रतिनिधी
चातकासारखी ज्याची शेतकऱ्यांसह सर्व-सामान्य जनता वाट पहात होते,त्या वरूणराजाचे आगमन अखेर पंधरवड्यानंतर का होईन पण दमदार आगमन झाले.रविवार पहाटे-पहाटे साडेतीन,चार वाजेच्या सुमारास विजेचा कडकळाट आणि मेघ गर्जनेसह तालुक्यातील जवळपास सर्वच ठिकाणी जोरदार पावसाला सुरूवात झाली होती.सुमारे तासभर पडलेल्या पावसामुळे कोरड्याठाक पडलेले नाले-गटारी वाहु लागल्याचे सुखद चित्र होते. दुष्काळाच्या झळांनी आधीच संपुर्ण तालुका होरपळला आहे,त्यात गावो-गावी निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई, पशुपक्षांना जंगलात असलेला पाण्याचा वाणवा,ईकडे पशुधनासाठीही पिण्याच्या पाण्याबरोबर आता चाऱ्याच्या टंचाईची नव्याने भर पडली. त्यातच पंधरा-विस दिवसाच्या उशीराने का होईना पावसाच्या सरी बरसु लागल्या.
धावपळीसोबत आता आनंदही – अनेक दिवस शेत पेरणीसाठी सज्ज ठेऊन,बि-बियाणे,ईतर सर्व सामग्रिची जय्यत तयारी शेतकऱ्यांनी करून ठेवली होती, ईकडे सिंचनाची व्यवस्था असणाऱ्यांनिही शेतातील जलस्त्रोतांमधील पाण्यात कमालिची घट झाल्याने कोणत्याही बियाणे लागवडीची जोखीम घेतली नाही.आता सद्य परीस्थितीत तरी पावसाला चांगलीच सुरूवात झाल्याने शेतकरी वर्ग आनंदी तर आहेच त्यासोबतच पेरणीसाठी चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. दुसरीकडे तीव्रटंचाई निर्माण झालेल्या गावांनाही वरूणराजाच्या आगमनाने चिंता दुर होण्यास मदतच होणार असल्याचे सर्वच ठिकाणचे चित्र आहे.