सार्वे-जामने सरपंच संजय पाटील यांच्या प्रयत्नांना यश : शेतकर्यांचे हाल थांबणार
लोहारा, ता.पाचोरा दि. 30 –
कोणत्याही निवडणुका आल्या की, व्होट बँकेसाठी या रस्त्याच्या समस्या चा विषय घेऊन मतदारांचे लक्ष केंद्रित केले जायचे व भोळ्याभाबड्या मतदारांना फसवले जायचे यामुळे हा रस्ता घोषणांचा पाऊस व आश्वासनांचे पिक या स्थितीत अडकून परिसरातून बहुप्रतिक्षेत होता या रस्त्याची आता गौण अवैध वाहतुकीने नुसती चाळणं झाली वाहनधारकांसोबत खाली हात चालणे अवघड झाले होते खराब रस्ता केवळ धोपट मार्ग असल्या कारणाने परिसरातील शेतकर्यांना पर्याय नव्हता पण हा रस्ता लवकर व्हावा अशी ओरड सर्व स्तरातून होत सोशल मिडियाला पुरण होऊन तरुणांकडून टीकेची झोड उठायला सुरुवात झाली होती या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे हा रस्ता जिल्हा महामार्गासह गुजरात आणि मध्यप्रदेश जोडणार्या महामार्गांना जाण्यासाठी महत्वाचा असल्याने सार्वे-जामने सरपंच संजय पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला.
या रस्त्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर असून 4 कि.मी. रस्ता खडीकरण होऊन डांबरीकरण होणार आहे. उर्वरित कामही टप्याटप्याने होणार आहे. लोहारा येथील सहकारी भाजपा कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य कैलास चौधरी, सुनिल क्षीरसागर यांनी वेळोवेळी सुचित केल्याची माहिती सार्वे-जामने सरपंच संजय पाटील यांनी दिली. या रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने 4 कि. मी.रस्त्यावर हाल थांबणार आहेत मात्र हा बैलगाडीनाही त्रासदायक खड्डेमय, कसरतमय पूर्ण रस्ता 8 ते 10 किलोमीटर असतांना बहुप्रतिक्षेनंतरही अपूर्ण होत असल्याने नाराजीही व्यक्त केली जात आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.