मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. आज सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनं महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बविआचे तीनही आमदार महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी होतील, अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी माध्यमांना दिली.