बहुजन क्रांती मोर्च्याच्या आंदोलनाच्या तिसरा टप्पा

0

बुधवारी भारत बंद

जळगाव दि २७ – देशात एन.आर.सी, सी.ए.ए व एन.आर.पीच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्च्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. तीन टप्प्यात राष्ट्रव्यापी आंदोलनांची घोषणा करण्यात आली होती, त्यापैकी अंतिम टप्पा  दि. २९ जानेवारी रोजी भारत बंद करण्यात येणार आहे अशी माहिती भारत बंद निर्माण समितीचे राजेंद्र खरे  यांनी दिली.

नागरिकतत्व, सीएए व एनआरपी कायदे करून ते फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर एससी,एसटी, ओबीसी विरोधी आहे. कारण आसाममधील एन.आर. सीच्या अंतिम सूचित बाहेर काढण्यात आलेल्या १९ लाख लोकांपैकी ५ लाख मुस्लिम सोडले तर १४ लाख एससी,एसटी,ओबिसी आहेत यासर्व लोकांना नागरिकतत्व तर दिला जाईल पण ते हिंदूंच्या नावावरच असणार असे ही यावेळी सांगण्यात आले. तसेच भारतीय संविधानाने कुठल्याही धर्माचा भेदभाव करण्यास सांगितलेले नाही व संविधान कलम क्र१५ नुसार धर्म, वंश, जात,लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव केला जाऊ शकत नाही.तसेच या कायद्यानुसार सर्वच समान आहे. यासमानता मिळण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चा तर्फे राष्ट्रव्यापी आंदोलन देशभरातून ५५० जिल्ह्यातून करण्यात येईल. यापूर्वीही यामोर्च्याचे दि.२० डिसेंबर रोजी जिल्हा स्तरीय एक दिवशी धरणा प्रदर्शन करण्यात आले होते. त्यानंतर दि ८ जानेवारीला जिल्हा स्तरीय रॅली काढण्यात आली होती.तसेच बुधवारी ही १५ तालुक्यातून याबंदला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळणार आहे अशी अपेक्षा पत्रकार परिषेदत सोमवारी व्यक्त करण्यात आली. यावेळी शिवराम पाटील, अयाज अली, फारूक कादरी, सुनील देहदे, अशोक सोनवणे, अशफाक पिंजारी, राधे शिरसाढ, फईम पटेल, ईश्वर मोरे, डॉ. शाकीर पटेल, फिरोज पठाण, इबा पटेल, रिजवान जहागीरदार, रईस बागवान आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.