मुक्ताईनगर :- बहुजन क्रांती मोर्चा तर्फे विविध मागण्यांसाठी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन व भारत बंद चे आयोजन करण्यात आले आहे. मुक्ताईनगर येथील विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक नितीन गाढे यांनी दिलेल्या सांगितले की, प्रसिद्धीपत्रकात सवर्णांना दहा टक्के आर्थिक आधारावर आरक्षणाच्या विरोधामध्ये ईव्हीएम संबंधित निवडणूक आयोगाद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अवमान याच्या विरोधामध्ये दोनशे पॉईंट रोस्टर प्रणाली च्या ऐवजी तेरा पॉइंटर लागू करून आरक्षण संपवण्याचे षडयंत्र केले जात आहे. जातीच्या आधारावर 100% आरक्षण लागू न करणे धार्मिक अल्पसंख्यांक मुस्लिम ख्रिश्चन जैन बुद्धिस्ट लिंगायत शिक यांच्या विरोधातील कम्युनल व्हायलन्स प्रेवेंशन अॅक्ट तयार केल्या विरोधात एम व्हीसी व घुमंतू जनजातीच्या केंद्रीय स्तरावर स्वतंत्र वर्गीकरण न करणे व शासन प्रशासनात प्रतिनिधित्व न देणे आदिवासीं ना पाणी जमीन व जंगल यापासून वंचित करून संविधानातील 5 6 या अनुसूची लागू न करणे, एस सी एसटी ओबीसी आरक्षणात वर्गीकरण लागू न करणे, तसेच धार्मिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या भागांमध्ये आरक्षण लागू न करणे, याविरोधात बहुजन क्रांती मोर्चा या बहुजनांच्या संघटनेअंतर्गत दिनांक 26 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता एकाच वेळी 31 राज्य 550 जिल्हे आणि चार हजार तालुक्यांमध्ये राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलनाचे आयोजन वामन मेश्राम राष्ट्रीय संयोजक बहुजन क्रांती मोर्चा यांच्या नेतृत्वात करण्यात आले आहे.
सदर जेलभरो आंदोलन व भारत बंद ला भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा संविधान बचाव संघर्ष संभाजी ब्रिगेड मौर्य क्रांती राष्ट्रीय मोर्चा बी एम पी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय बेरोजगार मोर्चा यांचा पाठिंबा आहे. यावेळी नितीन गाडी, किशोर धायडे, कैलास पाटील, राजू वानखेडे, तुकाराम पाटील, प्रमोद सुभाष बने, उल्हास मोरे, विठ्ठल धनगर, लखन विनोद सोनवणे, सिद्धार्थ हिरोळे, मनीषा वानखेडे, हेमा इंगळे, कल्पना सौंदळे, मनीषा गाढे हे उपस्थित होते