बहिणाबाईंचे काव्य जीवनाचे सार : डॉ. जी. एच. सोनवणे     

0

पारोळा-

येथिल किसान कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात भाषा मंडळाचे उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ जी एच सोनवणे यांनी प्रतिपादन केले.सोबतच बहिणाबाईंचे व्यक्तीत्व आणि  क्रृतित्वबाबत उजाळा देत असतांना भाषा, साहित्य, संस्कृति जोपासने अत्यंत आवश्यक आहे असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिंदखेडा येथिल प्रा. यशवंत निळवाडे हे होते त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना जीवनात शिष्टाचार व सभ्यता महत्वपूर्ण असुन आजच्या धकाधकीच्या जीवनात मूल्य जोपासने गरजेचे आहे याकरिता बहिणाबाईंच्या काव्याचा आधार घेऊन बहिणाबाई ह्या चालते बोलते विद्यापीठ होत्या त्यांनी बोलीभाषेतच काव्य रचना केली. त्यांच्या काव्यात जिवनानुभाव आहेत.आपल्या विचारांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ प्रदीप औजेकर यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा डॉ मानिक बागले यांनी करुन दिला, तर प्रा डॉ  सविता चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.प्रास्ताविक प्रा.मंगल बाविस्कर यांनी केले.या कार्यक्रमास प्रा मकासरे, प्रा भोई, प्रा महाले, डॉ गव्हाणे सह बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.