बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील पालक पुल बनला धोकेदायक

0

धानोरा (विलास सोनवणे) :   बर्हाणपुर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावर धानोरा गावावर असलेला ‘पालक पुल’ ची स्थिती धोकेदायक बनलेली आहे.या पुलाचे दोन्ही कठडे तुटलेले असुन अनेक ठिकाणी पडझड होऊन कमकुवत झालेला आहे.तर २००६,२००९,२०११ साली मोठ- मोठे पुर आल्यामुळे पुलाखाली गाळ साचलेला आहे.यामुळे सातपुडा पर्वतातुन आलेले पुर,पाणी वाहण्यास अडचण होते.तरी या सर्वप्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कानाडोळा करीत असुन,लोकप्रतिनीधीनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जवळपास चाळीस ते पन्नास वर्षापुर्वी झालेले हे बांधकाम आहे.हा एकमेव मार्ग बर्हाणपुर-अंकलेश्वर या दोन राज्यांना जोडतो.याच मार्गावर अवजडसह इतर वाहनांची वर्दळ असते.ह्याच पुलाजवळच बिडगाव व मोहरद या गावांना जोडणारे रस्ते आहे.यामुळे प्रवाशांची वर्दळ नेहमीच असते.त्याचबरोबर गावात जाणारे दोन मुख्य रस्ते आहेत.वाहनांच्या गर्दीमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते.यामुळे लहान अपघात होतच असतात तर मोठे अपघातांना आमंत्रण मिळत आहे.त्यातच गेल्या अनेकवर्षापूर्वी सातपुडा पर्वतातुन आलेले मोठ मोठे पुर ह्या पुलाच्या वरुन गेले आहेत.तर गाळ हा पुलाखालीच साचल्याने फक्त तीनचफुट उंची शिल्लक आहे.

दोन्हीही बाजुंचे लोखंडी कठडे,धक्के हे पूर्णतः तुटलेले असल्याने धोका अधिकच निर्माण झालेला आहे.गेल्या अनेक वर्षापासुन ही तुटलेली स्थिती जैसे थे आहे.यामुळे वाहनधारकांना आपले वाहन जपुन चालवावे लागते.तरी अनेकवेळा रात्री याच पुलावरुन वाहने,मोटारसाईकल,ट्रक काठावर अडकतात,तर काही थेट धडकतात.हा पालक पुल गावाला लागुनच आहे.यामुळे धोका अधिकच निर्माण झाल्याने या पुलाची त्वरीत दुरुस्ती करुन उंची वाढवण्यात यावी,अशी मागणी धानोरा ग्रामस्थ,वाहनचालक करीत आहेत.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

धानोरा गणात एक पंचायत समिती सदस्य,अडावद-धानोरा गटात एक जि प सदस्य निवडून येतात.तरी यांच्याच राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळेच या गंभीर स्वरुपाचा पालक पुलाची स्थिती धोकेदायक बनलेली आहे.सोबत चोपडा,अमळनेर बांधकाम विभागाने आणि चोपडा मतदारसंघाचे आमदार,रावेर लोकसभा खासदार यांनी तरी या पुलाकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.कधी नव्हे महाड सारखा मोठा अपघात होण्याची वाट हे सर्वजण बघत तर नाही ना? असा सवाल उभा ठाकतो.

वाहन कधी पडेल याचा नेम नाही.

माझी या पुलावरुन नेहमीची वर्दळ असते.दोन्हीही बाजुचे संरक्षक कठडे तुटलेले आहे.यामुळे वाहन हळु चालवावे लागते.वाहनातील प्रवाशी देखील घाबरतात.याच पुलावर वाहन असतांना समोरून जर एखादे वाहन आले तर खुप फजीती होते.कारण कठडेच तुटलेले आहे.

ग्रा.प सदस्य मुक्तार आली

(वाहक धानोरा)

सत्तर वर्षीय जुना पुल.

या पुलाचे बांधकाम जवळपास सत्तर वर्षापुर्वी झालेले आहे.या पुलाची सध्याची स्थिती अतिशय धोकेदायक आहे.संरक्षक कठडेच नसल्याने एखादे वाहन वेगाने आल्यास सरळ पुलाखाली जाईल.तरी लवकर दुरुस्ती नाही झाली तर मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

माणिकचंद महाजन (उपसभापती चोपडा,ग्रा प सदस्य धानोरा )

Leave A Reply

Your email address will not be published.