पारोळा | प्रातिनिधी
तालुक्यातील बहादरपूर येथील एका ३३ वर्षीय तरुण शेतकऱ्याने त्याच्या स्वताच्या शेतात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
याबाबत महेंद्रकुमार एकनाथ अमृतकर (३३)हा दि ११ मे रोजी घरात कुणास काही एक न सांगता निघून गेला होता त्याची शोधा शोध केली असता तो मिळून आला नाही दि.१३ रोजी सकाळी ८ वाजता भाऊ प्रमोद अमृतकर हे त्यांच्या स्वताच्या शेतात ट्रॅकटरने रोटा मारण्यासाठी जात असताना भाऊ महेंद्र हा शेतात झोपलेल्या अवस्थेत दिसून आला त्याच्या तोंडातून विषारी औषधाचा वास येत असल्याने त्यास तात्काळ पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यास तपासून डाँ योगेश साळुंखे यांनी मयत असल्याचे सांगितले. याबाबत पारोळा पो स्टे ला प्रमोद एकनाथ अमृतकर यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हे कॉ काशिनाथ पाटील हे करीत आहेत.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post
Next Post