बस कंन्डक्टरचा प्रामाणीकपणा,अडीच लाखाच्या ऐवजासह ,महीला प्रवाशाची पर्स केली परत

0

जामनेर(प्रतिनिधी) :- भुसावळहुन जामनेर बसस्थानकामधे आलेल्या भुसावळ-पुणे बसमधुन उतरलेल्या महीला प्रवाशाची पर्स येथील बसकंडक्टर महेंद्र विठ्ठल महाजन यांनी त्या महीलेला चक्क परत केली.

त्या पर्समधे सुमारे अडीच लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागीने,पाचशे रूपये रोख असा ऐवज होता. भुसावळ-पुणे  नंबर एमएच २०-४१३२ ह्या बसने जामनेरला उतरलेल्या वैशाली पाटील या त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या पर्स हरवील्याचे लक्षात आले,त्यांनी लागलीच धावा-धाव करून जामनेरआगाराशी संपर्क साधला,बसकंडक्टरनेही क्षणाचाही विलंब न लावता तुमची पर्स जशीच्या-तशी सुरक्षीत माझ्या जवळ असल्याचे सांगीतले.आणी आज (१०)सकाळी ती पर्स त्या महीला प्रवाशाच्या हाती सुपुर्द केली.या प्रामाणीक पणामुळे आगारप्रमुख कमलेश धनराळे ,दिलीप मराठे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी,कर्मचाऱ्यांनी,नागरीकांनी कौतुक केले.

Leave A Reply

Your email address will not be published.