अमळनेर(प्रतिनिधी) : शहरात बस स्थानकासमोर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने एकास उडवल्याची घटना आज बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील रहिवासी महारु हिलाल पाटील हे अमळनेर शहरात बाजार करण्यासाठी आले होते. बाजार करून शहरातील भागवत रोड कडून बस स्थानकाकडे जातांना,धुळे रस्त्याकडुन बस स्थानकाकडे डंपर चालक विनोद गोबा भिल्ल(MH 19 CW 4660)
याने रस्त्याने चालणाऱ्या महारु हिलाल पाटील यांना धडक दिल्याने चिरडले गेले.अपघात एवढा भयानक होता की मृताच्या शरीरातील सर्व आतड्या बाहेर आलेल्या होत्या.पाटील हे जागेवरच गतप्राण झाले.पुढील तपास पो.हे.काँ.सुनिल हटकर करीत आहेत.