मुजफ्फरनगर ;- बिहारमधील मोतिहारी येथे बस पलटी होऊन लागलेल्या आगीत २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस मुझफ्फरनगर येथून दिल्लीला जात होती. बसचालकाचं नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरुन खाली उतरली आणि थेट खड्डयात जाऊन पलटी झाली. यानंतर बसला आग लागली ज्यामुळे प्रवाशांना बसमधून बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही आणि होरपळून मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शीच्या मते, बसनं जागेवरच पलटी मारली आणि त्यानंतर बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. बसमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी वेळच मिळाला नाही. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुजफ्परपूर बस दुर्घटनेबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसेच ही आग एअर कंडिशनच्या कारणास्तव लागल्याची प्राथमिक माहिती नितीश कुमार यांनी दिली आहे. अपघातानंतर काही लोकांना बसमधून बाहेर काढण्यात आले आहे.