बसमध्ये चढतांना महिलेचे मंगळसूत्र लांबविले

0

जळगाव : बसमध्ये चढत असतांना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून नेल्याचा प्रकार घडला. नवीन बस स्थानकात हा प्रकार घडला असून  दोन अल्पवयीन मुलींनी ही चोरी  केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहेत.

रूपाली गिरीश गुरव (वय 27, रा. पिंप्राळा) असे या चोरी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या आज सकाळी नवीन बस स्थानकात जळगाव- शिरपूर बसने माहेरी जाण्यासाठी निघाल्या. बसमध्ये चढत असताना दोन अल्पवयीन मुलींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडले. गर्दीतून आत गेल्यानंतर त्यांनी आरडा ओरडा केला. परंतु तो पर्यंत त्या मुली पसार झाल्या होत्या. याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. रुपाली गुरव यांच्या सोबत त्यांचे पती गिरीश भालेराव गुरव हे देखील होते. सोबत दोन मुले असल्याने पती गिरीश यांनी मुलांना बसमध्ये आत सोडण्यासाठी बसमध्ये आधीच चढले होते. तर रूपाली या बसमध्ये चढत असतांना हा प्रकार घडला.

Leave A Reply

Your email address will not be published.