Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»बसमधून महिलांचे दागिने लांबविणाऱ्या दोन महिलांना अटक
    उत्तर महाराष्ट्र

    बसमधून महिलांचे दागिने लांबविणाऱ्या दोन महिलांना अटक

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 18, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बसमधून महिलांचे दागिने लांबविणाऱ्या दोन महिलांना अटक

    अमळनेर: प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी अमळनेर पोलिसांनी उत्कृष्ट तपास करून सुमारे आठवडाभराच्या शोधमोहीमेनंतर दोन महिलांना अटक केली असून सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

    सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक ६ मार्च २०२५ रोजी दुपारी २ वाजता, तक्रारदार प्रतिभा जिजाबराव पाटील (वय ४८, रा. गारखेडे, ता. धरणगाव) या धरणगाव येथून जळगाव-दोंडाईचा बसने वाघोदे (ता. शिंदखेडा) येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी पाकिटात ठेवलेले दोन सोन्याच्या बांगड्या आणि मंगळसूत्र त्यांच्या पर्समध्ये सुरक्षित ठेवले होते.

    बसमध्ये त्यांच्याजवळ दोन अनोळखी महिला बसलेल्या होत्या. अमळनेरच्या चोपडा नाका स्टॉपवर त्या महिला उतरल्यानंतर तक्रारदारांनी पर्स तपासली असता सोन्याचे दागिने गायब झाल्याचे लक्षात आले. त्वरित शोध घेऊनही दागिने न सापडल्याने त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते आणि परी पोलीस उप-अधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस पथक तैनात करण्यात आले.

    गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता, चोरी करणाऱ्या महिला सतत आपले वास्तव्य बदलत असल्याचे आढळून आले. त्या जळगाव, अकोला, बार्शी टाकळी, परतवाडा तसेच मध्य प्रदेशातील तिगाव, पांडुरणा आणि इंदूर येथे वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होत्या. पोलिसांनी सातत्याने पाठलाग करून अखेर वरुड (ता. वरुड, जि. अमरावती) येथे आठवडी बाजार भागात आरोपींना अटक केली.

    गंगा चैना हातगळे (वय ४०, रा. नेताजी नगर, यवतमाळ)
    गंगा सुभाष नाडे (वय ४५, रा. नेताजी नगर, यवतमाळ) या दोन महिलांना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

    गेल्या ८ ते ९ दिवसांपासून पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यासाठी अथक प्रयत्न केले. गोपनीय माहितीचा आधार घेत आणि तांत्रिक साधनांचा वापर करून अखेर पोलिसांनी या गुन्हेगारांना गजाआड केले. या कारवाईमुळे प्रवाशांमध्ये विश्वास वाढला असून, पोलिसांच्या तडफदार तपासामुळे अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी मोठे यश मिळाले आहे.

     

    #gold Aman crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif