बळीराम पेठमधील दुकान फोडले ; २४ हजाराची रोकड लंपास

0

जळगाव । शहरातील बळीराम पेठेमधील पत्रकार भवन शेजारी असलेल्या जे. पी. शुजचे शोरूमचे सर्व कुलूप तोडून ५ ते ६ चोरट्यांनी दुकानामधील २४ हजाराची रोकड लंपास केला आहे. तसेच बाहेर लावलेले सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांचे वायरी तोडून पोबारा केल्याची घटना आज पहाटे २ वाजेच्या सुमारास घडलीय.

चोरी झाल्याची घटना कळताच दुकान मालकांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवाली असून आज सकाळी (सोमवारी) श्वान पथक घेऊन पहानी करुण रेल्वे मार्ग पर्यंत मार्ग काढला.  पुढील तापस शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी करित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.