Saturday, October 1, 2022

बर्निंग बसचा थरार, 20-25 प्रवाशांसह बस रस्त्यात पेटली

- Advertisement -

पिंपरी चिंचवड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार पहायला मिळाला. दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर पीएमपीएमएलच्या बसला अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये 20 ते 25 प्रवासी होते. मात्र सुदैवाने चालकाने प्रवाशांना वेळीच बसमधून उतरवल्यामुळे या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

- Advertisement -

- Advertisement -

पीएमपीएमएलची बस पुण्याहून दापोडीला येत होती. त्यात वीस ते पंचवीस प्रवासी प्रवास करत होते, मात्र प्रसंगावधान दाखवत चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दापोडी भागात मुळा नदीच्या पुलावर असताना आधी इंजिनमधून धूर येताना दिसला, त्यामुळे बस ड्रायव्हरने सर्व प्रवाशांना बसमधून तात्काळ खाली उतरवले. त्यानंतर बसने पेट घेतला. आग भडकल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

ही बस सीएनजीवर चालणारी असल्याने गॅसच्या टाकीपर्यंत आग पोहचू न देण्याचं आव्हान जवानांसमोर होतं. त्यात त्यांना यश मिळालं आणि आग आटोक्यात आली.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या