चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील बोढरे शिवारातील गट नंबर ६९/१ मधील शेत जमीन मूळ मालकाला न माहितीने बनावट कागदपत्रे तयार करून तब्बल 91 लाख रुपयाचा सोलर कंपनीला खरेदी-विक्री केल्याचा प्रकार उघड झाला असून, याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला तत्कालीन सबरजिस्टार सह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मूळ मालक गीता गोविंद कुलकर्णी यांची तालुक्यातील बोढरे शिवारात गट नंबर 69/ 1 मध्ये शेत जमीन आहे. परंतु दिनांक ३/८/ 2018 रोजी त्यांना न माहितीने सुरेंद्र कुमार आर्य, , निशांत आर्य,, सुनील आर्य, भगवान दत्त शर्मा, कुशाग्र अग्रवाल, यश प्रिय आर्य, नाना पुंडलिक पाटील, मनीषा उपासणी, डेटा एंट्री ( ऑपरेटर पूर्ण नाव माहीत नाही) व इतर तीन अनोळखी व्यक्ती अशांनी आपापसांत संगनमताने वेगवेगळ्या बनावट व्यक्ती वेगवेगळे बनावट कागदपत्रे तयार करून आर्थिक लाभासाठी यांची शेत जमीन बोढरे शिवारातील सोलर कंपनीला 91 लाख रुपयांना शेतजमिनीची फसवणुकीच्या उद्देशाने खरेदीखत केले.
या फसवणुकीची साठी तत्कालीन सबरब्जिस्टर मनीषा उपासनी व चाळीसगाव येथील कार्यालयातील डेटा एंट्री ऑपरेटर यांनी मदत केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला ऍडव्होकेट केदार चावरे राहणार शाहूनगर चाळीसगाव यांच्या फिर्यादीवरुन तत्कालीन रजिस्टार मनीषा उपासनी सह सुरेंद्र कुमार आर्य निशांत आर्य सुशील आर्य भगवान दत्त शर्मा कुशाग्र अग्रवाल यश प्रिय आर्य नाना पुंडलिक पाटील डेटा एंट्री ऑपरेटर व इतर तीन बनावट अनोळखी व्यक्ती यांच्यावर भा द वि 420 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाळीसगाव पोलीस स्टेशन करीत आहे
चाळीसगाव तालुक्यात जमीन खरेदी विक्री करणारी मोठी टोळी असून या टोळीला राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्या दादागिरी करणाऱ्या डोळ्या सुद्धा आहेत या प्रकरणावरून या बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या व गोरगरीब शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी बळजबरीने लिहून घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश व्हावा अशी जनसामान्यात चर्चा आहे.