बद्रिनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल बहादरपूर शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

0

पारोळा : बहादरपूर : येथील नूतन शिक्षण संस्था संचलित बद्रिनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल बहादरपूर शाळेत नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली.

प्रथमतः कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक मनोज भिकन चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळेच्या शिक्षिका निकिता बोरसे व अध्यक्षीय मनोगतात मनोज चौधरी यांनी मुलांनाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रोहिणी तावडे यांनी तर आभार प्रदर्शन स्नेहल पाटील यांनी केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी मुख्याध्यापक .मनोज भिकन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका छाया पाटील सुवर्णलता जावरे, प्रियंका बडगुजर,सविता पाटील,भाग्यश्री पाटील,मनिषा चौधरी रुपाली चौधरी मदतनीस अलका चौधरी ,चंद्रशेखर लोकाक्षी आदींनी मेहनत घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.