खरात परिवाराची भावनीक मागणी; स्थानिक पोलिसांवर मात्र विश्वास नाही
भुसावळ –
माझ्या वडीलांवर वीस ते पंचविस मिनीट हल्ला होत होता.पोलिस दोन तासा नंतर पोहचले,एका मागुन एक हल्ले होत आमच्या परिवारातील पाच लोकांचा जिव गेला आहे.हे आम्ही कधीच विसरु शकत नाही मात्र कुणाचा बदला वगैरे घेण्याची आमची मानसिकता नाही न्यायालय व वृत्तपत्रांवर आमचा विशवास आहे स्थानिक पोलिसांवर नाही.हे हत्त्याकांड म्हणजे सुनियोजित षडयंत्र आहे या मागे असलेला ब्रेन शोधुन या सर्वांना फाशीच व्हावी अशी मागणी मयत रविंद्र खरात यांची मुले आशिष खरात व राजकुमार खरात तसेच पत्नी रजनी खरात यांनी त्यांच्या संमती नगर मधील घरी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.