बदनामीची भीती; अल्पवयीन मुलीचे घरातून पलायन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने घरुन पलायन गेले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पेालिसात गुन्हा दाखल झाला आहे

रामानंदनगर पोलिसांच्या हद्दीत एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. अल्पवयीन मुलीचे तिच इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आक्षेपार्ह फोटो अपलोड झाले. त्यामुळे बदनामी होईल या भितीने अल्पवयीन मुलगी सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता घरात कुणाला काहीएक न सांगता निघून गेली आहे.

रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी पुन्हा परत आली नाही. अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय सुध्दा मुलीच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलीच्या आईने रामानंदनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here