Saturday, January 28, 2023

बडोदा बॅंकेच्या भोंगळ कारभाराविषयी डीवाय एफआयतर्फे आंदोलन

- Advertisement -

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

नोटांबंदी पाठोपाठ देना बँकेचे रुपांतर बडोदा बॅंकेत झाल्याने सर्वसामान्य जनतेला व्यवहारा करीता खुपच हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याच भोंगळ कारभाराविषयी डीवाय एफ आय संघटनेतर्फे युवकांनी रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन छेडले.

तालुक्यातील आदिवासी, शेतकरी, युवक, विद्यार्थी, व्यावसायिक यांना  अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तालुक्यात (देना बँक) बॅंक ऑफ बडोदा या सर्वात जुन्या बॅंक शाखेमध्ये साधारण एक लाखाहून अधिक खातेदार आहेत. त्या खातेदारांमध्ये शिष्यवृत्ती घेणारे सर्व विद्यार्थी, वेतन घेणारे सर्व सरकारी नोकर वर्ग, शेतकरी, व्यापारी, वृध्दपकाळ पेन्शन घेणारे, बचत गट यांच्या खात्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

पुर्वी देना बँक होती, आता त्या  बॅंकेचे वर्गीकरण बॅंक ऑफ बडोदामध्ये झाल्यामुळे साधारण एक वर्षापासून शे दोनशे खातेदार सोडले तर उर्वरित एक लाख खातेदारांना अद्याप पर्यंत बॅंक पासबुक मिळाले नाही. पासबुक अभावी आज सर्व खातेदारांना खूप अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सरकरी नोकर वर्गाला त्यांचा पगार खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागते. विद्यार्थांना त्यांच्या शिष्यवृत्तीसाठी बॅंक पासबुक आवश्यक आहे. शेतकरी, व्यापारी यांचे दैनंदिन व्यवहार याच बॅंकमधुन पासबुक अभावी सुरू आहेत.

तसेच महिला बचत गट आणि वृध्दपकाळ पेन्शन योजनेचा लाभ घेणारे सर्व लाभार्थी याच बॅंकेचे खातेदार आहेत. गेल्या एक महिन्यापुर्वी खातेदार लोक रात्री बॅंकेच्या दारात नबंर लावून  तेथेच भर पावसात झोपत होती. ही  भयंकर वाईट परिस्थिती आम्हाला पाहावली गेली नाही. म्हणुन वरिल सर्व खातेदारांची गेल्या एक वर्षापासून सुरू असलेली पिळवणूक थांबवून संबंधित सर्व खातेदारांना एक महिन्याच्या आत बॅंक पासबुक वर फोटो लावून त्याच्यावर बॅंक मॅनेजर यांची सही शिक्का मारुन ते पासबुक खातेदारांना विनाविलंब वितरीत करण्यात यावे यासाठी आज युवा क्रांतिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली बॅंक ऑफ बडोदा येथे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी विविध समस्यांचे निवेदन बॅंकेचे शाखाधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी  पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार उपस्थित होते.

शाखाधिकारी यांनी आंदोलन कर्त्यांना आश्वासन दिले की, येत्या एक महिन्याच्या आत सर्व खातेदारांना पासबुक उपलब्ध करून देण्यात येईल. असे लेखी दिल्या नंतर आंदोलन  मागे घेण्यात आले. या आंदोलन कर्ते यांच्या मागणीत   बॅंक पासबुक पासून वंचित असलेल्या सर्व खातेदारांना बॅंक पासबुक उपलब्ध करून दिले पाहिजे, बॅंक पासबुक उपलब्ध करून दिल्यानंतर ते वेळोवेळी अपडेट करुन देण्यात यावे, बॅंक ऑफ बडोदाचे स्थलांतर मोकळ्या प्रशस्थ जागेमध्ये करण्यात यावे, बॅंक ऑफ बडोदा शाखेमधील मयत झालेल्या खातेदारांचे वारस लावून त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात यावेत, केवायसी न केलेल्या खातेदारांना बोलावून त्यांचे खाते  केवायसी  करुन देण्यात यावे, बा-हे, पळसन येथील बंद पडलेल्या बॅंक ऑफ बडोदाच्या उपशाखा पुन्हा एकदा कार्यान्वित करुन सुरू कराव्यात अशा मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात पांडुरंग गायकवाड, सुभाष भोये, अशोक धुम, चंद्रकांत वाघेरे, कान्हा हिरे, शिवराम गावित, राहुल आहेर, देविदास हाडळ, नितीन गावित, मेनका पवार, रोहिणी वाघेरे,सविता गायकवाड, भारती चौधरी, नितीन पवार, सुनिल जाधव, संतु पालवा, वसंत झिरवाळ, गुलाब खांडवी, गिरीष गायकवाड, मधुकर म्हसे,

दानिएल गांगुर्डे, जगन गावीत, राहुल गावीत, लिलाधर  चौधरी, अशोक भोये, हेमंत भुसारे, योगेश थोरात, संस्कार पगारीया आदी युवा कार्यकर्त्यांनी  उपस्थित मोर्चाचे नेत्रृत्व केले. आंदोलनास धर्मेंद्र पगारीया, सुरेश गवळी, मधुबाबा, राजु बाबा शेख, वसंत बागुल, चिंतामण गवळी, भास्कर जाधव, योगेश महाले, पांडुरंग गावीत, मोहन पवार, कृष्णा भोये  यांनी पाठिंबा दिला.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे