Saturday, January 28, 2023

बंद पाळून शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्या !

- Advertisement -

अमळनेर | प्रतिनिधी 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकरी आंदोलनात नरसंहार करणारे आधुनिक जनरल डायर तथा शेतकऱ्यांचे मारेकरी योगी तथा भाजपा सरकारच्या निषेधार्थ  महाविकास आघाडीने उद्या सोमवार दि. 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले असल्याने या बंद मध्ये सर्वांनी

मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून द्यावे असे जाहीर आवाहन अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आ.अनिल भाईदास पाटील यांनी महाविकास आघाडीतर्फे केले आहे. यासंदर्भात आ.पाटील यांनी आवाहन करताना म्हटले आहे की लखीमपूर घटनेवरून राज्यातील व अमळनेर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या भावना तीव्र असून यामुळे सोमवार च्या बंदमध्ये येथील जनता निश्चिंतपणे सहभागी होईल,येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह आघाडीतील शिवसेना,काँग्रेस व इतर घटक पक्ष संपूर्ण ताकदीने बंद मध्ये उतरणार आहेत,लखीमपूर मध्ये ही संविधानाचीच हत्या झाली असून अन्नदाता शेतकऱ्यांना संपविण्याचे हे खडयंत्र आहे,त्यामुळे मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि येथील जनता शेतकरी पाठिशीच आहे हे आम्ही उद्या कळकळीत बंद पाळून दाखवून देऊ असा दावा आमदार अनिल पाटील यांनी केला आहे.तर व्यापारी बांधवांसह जनतेने शेतकऱ्यांसाठी स्वयंस्फूर्तीने उद्याच्या बंद मध्ये सहभागी व्हावे अशी विनंतीही आमदारांनी केली आहे.

- Advertisement -

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे