Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    • जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव
    • काँग्रेसचा संविधानावर विश्वास नाही!
    • राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणार!
    • आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
    • पहाटे नदीतून घुमले मोठे आवाज अन् महापूर धडकला
    • पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»बंद घर फोडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल चोरी
    गुन्हे वार्ता

    बंद घर फोडून पावणे दोन लाखांचा मुद्देमाल चोरी

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 16, 2021Updated:August 16, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जळगाव शहरातील आदर्श नगरमध्ये बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून रोकडसह सोन्याचे दागिने व नेकलेस चोरून नेल्याचे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    हर्षल शिरीष भंडारी (वय ३७, रा. उज्ज्वल स्कूल जवळ, आदर्श नगर जळगाव) हे कुटुंबियासह राहतात. त्यांचा  कॅम्प्यूटरचा व्यवसाय आहे. हर्षल भंडारी हे अमळनेर येथील मुळ रहिवाशी आहे. त्यांच्या घरी कानुबाईचा कार्यक्रम असल्यामुळे भंडारी हे आपल्या कुटुंबियांसह शनिवारी १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता घराला कुलूप लावून अमळनेरला निघून गेले.

    दरम्यान आज सोमवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.१० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर राहणारे राजेंद्र पाटील यांनी हर्षल भंडारी यांना घरात चोरी झाल्याचे फोनद्वारे कळविले. घरात चोरी झाल्याचे समजताच भंडारी कुटुंबिय सकाळी ९.४५ वाजता घरी पोहचले. यात घरातील सामान अस्तव्यस्त केलेले दिसून आले. यात कपाटात ठेवलेले १ लाख ३९ हजार ५०० रूपयांची रोकड, १३ हजार रूपये किंमतीची ११ ग्रॅम सोन्याची मंगलपोत, ७ हजार २०० रूपये किंमतीचे ८ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, १५ हजार रूपये किंमतीच्या सोन्या लहान मोठ्या सोन्याच्या अंगठ्या आणि ८ हजार रूपये किंमतीचा डायमंड नेकलेस असा एकुण १ लाख ८२ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

    याप्रकरणी हर्षल भंडारी यांनी आज सकाळी ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon news Robbery News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif