Sunday, January 29, 2023

बंद घर फोडून दागिन्यांसह मुद्देमाल लंपास

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील गणपती नगर येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातून ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल  लंपास केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विलास कैलास सोनवणे (वय ३३, रा. गणपती नगर, जळगाव) हे खासगी वाहन चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. विलास सोनवणे यांच्या आजीचे वृध्दापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम असल्याने सोनवणे हे १४ नोव्हेंबर रोजी कुटुंबियांसह घराला कुलूप लावून जळगाव तालुक्यातील कंडारी येथे गेले.

- Advertisement -

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड, एलईडी टीव्ही, दोन पाण्याच्या मोटारी आणि गॅस हंडी असा एकुण ५७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे शेजारी श्यामलाल अहुजा यांनी विलास सोनवणे यांना संपर्क करून सांगितले.

याप्रकरणी विलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे