बंदुकीने जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बियरची बाटली मारून तरुणाला केले जखमी

0

जळगाव;-मागील भांडणाचा वाद काढून एकाला बंदूक ने मारण्याची धमकी देऊन बियरची फुटलेली बाटली मारून फेकून त्याला जखमी केल्याची घटना जळगाव रेल्वे स्थानकावर असणाऱ्या एका वाईन शॉप जवळ 30 जुलै रोजी घडली या प्रकरणी दोघांविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

30 जुलै रविवार रोजी शहरातील रेल्वे स्टेशन जवळ असणाऱ्या वाईन शॉप च्या दुकानावर दुपारी तीन वाजेच्या सुमारास  तनवीर शेख रहीम शेख (वय-२०) रा. मनिषा पार्क, अब्बु बकर कॉलनी, जळगाव हा तरूण उभा होता. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून अकील शेख अजगर उर्फ भुऱ्या आणि शकील (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांनी तनवीर शेख याला शिवीगाळ करून दमदाटी करू लागले. त्यानंतर शकीलने तनवीर शेखला पकडून धरले तर अकील शेख याने हातातील फुटलेली बिअरची बाटली मारली. यात तनवीर शेख रहिम शेख हा जखमी झाला. त्यानंतर अश्लिल शिवीगाळ करून बंदूकीने जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तनवीर शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विरेंद्र शिंदे करीत आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.