बंदिस्त नाटयगृहास छत्रपती संभाजीराजे नाव देण्याची राष्ट्रवादीची मागणी

0

जळगाव ;– बंदिस्त नाटयगृहास छत्रपती संभाजीराजे किंवा छत्रपती शंभूराजे यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने महानगर अध्यक्ष विशाल देवकर यांनी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली .

‌ निवेदनात म्हटले आहे कि , माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी रंगकर्मीसाठी माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याकडे सतत पाठपुरावा करत शासन स्तरावरून या नाटयगृहासाठी ३० कोटींच्या निधि मंजूर केला होता. आता हे नाटयगृह पूर्णत्वांच्या मार्गावर आहे . शहराच्या नावलौकीकात भर घालणाऱ्या या सुंदर व भव्य वांस्तूला छत्रपती संभाजी राजे किंवा छत्रपती शंभूराजे असे नामकरण करावे , छत्रपती संभाजीराजे हे शुर , पराक्रमी ,लढवय्ये युगपुरुष होते. त्यांनी बुध्दभुषण ग्रंथाचे लिखान करून आपल्या बालिदानाने आदर्श निर्माण करत रयतेचे राजे ठरले आहेत. त्यांचे पुण्यस्मरण करत त्यांचे नाव या नाटयगृहास देणे हे औचित्यपूर्ण ठरणार आहे . त्यांच्या नावाला कोणीही विरोध करणार नाहीत. उलट पक्षी समाजातील सर्व घटकांना आनंदच होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .
यावेळी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष निलेश पाटील , पुरुषोत्तम चौधरी , राजेश पाटील , संजय चंव्हाण , हेमंत पाटील ,युवकचे हर्षल पाटील , अशफाक पिंजारी , शरीफ पिंजारी , आश्विन पाटील , प्रणव पाचपांडे , महेंद्र सोनवणे , योगेश जाधव , संतोष भिल ,धिरज पाटील , आजिक्ये पवार , गणेश चव्हाण , उज्वल पाटील , गौरव भामरे ,तनवीर शेख , अशपाक मिर्ची , यश यादव , सचिन साळूंखे , हितेश भदाणे , प्रतिक पवार सह कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.