Wednesday, September 28, 2022

बंदला गालबोट; भाजप व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी

- Advertisement -

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क     

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेर्धात व कृषीचे तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी  महाविकास आघाडीने सोमवार रोजी बाजार पेठ  बंदचे आवाहन केल्याने शहरातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते दुकाने बंद करण्यासाठी बस स्थानक चौकात  बंदचे आवाहन करीत  असताना त्याच मार्गावर भाजपाचे कार्यकर्ते व्यापार व दुकाने सुरु ठेवा असे आवाहन करीत  असताना आघाडीचे व भाजपा कार्यकर्ते समोरासमोर आल्याने  हमरातुमरी होऊन राष्ट्रवादी तालुका अध्यक्षाची गच्ची धरताच एकच गोंधळ उडाला व त्यात माजी नगराध्यक्षाना गर्दीतून धक्का दिल्याने ते जागीच कोसळून खाली पडल्याने एकच  खळबळ उडाली मात्र पोलीसानी हस्तक्षेप करताच वातावरण निवळले.

- Advertisement -

- Advertisement -

शहरात  महाविकास आघाडी कडून बंद करण्याचे आवाहन करीत असताना  सोमवार रोजी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष  सकाळी दहा वाजेच्या सुमारास एकत्र येत व्यापरी व दुकानदारास शांततेत दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत असताना त्या ठिकाणी भाजपाचे कार्यकर्तेही याच ठिकाणी येऊन दुकानदारास व व्यापाऱ्यास आपला व्यावसाय सुरु ठेवण्याचे आवाहन करीत असताना दोघाचे कार्यकर्ते आमने-सामने आले व दोघा कडून घोषणाबाजी करीत असतानाच वाद निर्माण झाल.

यात राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दिपक मराठे यांची भाजपा कार्यकर्त्याकडून गच्ची धरली गेल्याने महाविकास आघाडीतील एका कार्यकर्त्यानी माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांना छातीत धक्का दिल्याने  ते जमीनीवर कोसळताच एकच गोंधळ उडल्याने कार्यकर्ते व नागरिकांमध्ये धावपळ सुरु झाली. मात्र वेळीस सह पोलीस निरिक्षक  आशिष अडसुळ यांना हस्तक्षेप करीत वाद मिटला.

नागरिकांची  धावपळ 

महाविकास आघाडी व भाजपात वाद सुरु असताना नागरिकांनी  धावपळ सुरू केल्याने शहरात दंगल झाल्याची अफवा पसरली गेल्याने नागरिकामध्ये एकच धावपळ सुरु झाल्याने पोलीस प्रशासनाने सर्वाना शांततेचे आवाहन करण्यात आले होते.

दोघ रुग्णालयात 

या घटनेत राष्ट्रवादी  तालुका अध्यक्ष दिपक मराठे  यांच्या अंगावर धावून गेल्याने  त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना चक्कर आल्याने लगेच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तर माजी नगराध्यक्ष सुनिल काळे यांना गर्दीतून त्यांच्या छातीवर जोरदार धक्का दिल्याने ते जमीनीवर कोसळल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन दोघाचीही तब्बेत स्थिर असल्याचे समजले.

दरम्यान घटनेची माहीती मिळताच अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व उप विभागीय पोलीस अधिक्षक विवेक लांवड यांनी शहरात भेट देऊन  नागरिकाना शांततेचे आवाहन केले असुन बस स्थानक परिसरात दंगा विरोधी पथक चौकात चोख बदोबस्त ठेवण्यात आला असुन परिस्थीती शांततेत असल्याचे सह पो निरिक्षक आडसुड यांनी सांगितले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या