जळगाव प्रतिनिधी
प्रत्येक निवडणुकीत बंडखोरी होते. मात्र या वेळेस ती जरा जास्त आहे. भाजप-सेनेचे तोलामोलाचे काम आहे. बंडखोरांचे बंड थंड करण्याचे काम सुरू आहे. ऐकून न घेणार्या बंडखोरांवर पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत देत शरद पवार व विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले.
शहरातील स्टेशनरोड स्थित एका हॉटेलात ना. गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद गुरुवार दि. 10 रोजी दुपारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी आ. राजुमामा भोळे, आ. चंदूभाई पटेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, भगत बालाणी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.